Lek Ladki Yojana Maharashtra 2025: मुलगी असेल तर मिळणार 1 लाख रुपये, बघा संपूर्ण माहिती

Lek Ladki Yojana Maharashtra 2025: मुलींच्या जन्मावरून अजूनही काही समाजांमध्ये भेदभाव केला जातो. आर्थिक अडचणी, शिक्षणाचा अभाव आणि लग्नासाठीचा खर्च यामुळे अनेक कुटुंबे मुलींच्या भविष्यासाठी चिंतित असतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने “लेक लाडकी योजना” सुरू केली आहे. ही योजना म्हणजे मुलींच्या जन्मापासून लग्नापर्यंत आर्थिक पाठबळ देणारी एक महत्त्वाची योजना आहे.

Mofat Ration Yojana Maharashtra 2025: रेशन कार्ड वर आता मिळणार या 10 वस्तु मोफत

Lek Ladki Yojana Maharashtra 2025 | लेक लाडकी योजना म्हणजे काय?

लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana) ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक सामाजिक योजना आहे. या योजनेत मुलीच्या जन्मापासून ते वयात येईपर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत दिली जाते. यामुळे मुलींचे पालनपोषण, शिक्षण व पुढील आयुष्य सुरक्षित करण्याचा सरकारचा उद्देश आहे.

योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत

लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीच्या वयानुसार खालीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने आर्थिक लाभ दिला जातो

वयाचा टप्पाआर्थिक मदत
जन्मावेळी₹5,000
1ली ते 4थी वर्ग₹4,000 प्रति वर्ष
5वी ते 7वी वर्ग₹6,000 प्रति वर्ष
8वी ते 10वी वर्ग₹8,000 प्रति वर्ष
11वी आणि 12वी वर्ग₹10,000 प्रति वर्ष
18 वर्ष पूर्ण झाल्यावर₹75,000 एकरकमी मदत

योजनेचा उद्देश

  • मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे
  • मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे
  • बालविवाहास प्रतिबंध करणे
  • महिलांच्या सशक्तीकरणाला चालना देणे
  • समाजात मुलगा-मुलगी समानतेची भावना निर्माण करणे

पात्रता काय आहे?

लेक लाडकी योजनेसाठी पात्र होण्यासाठी खालील अटी पूर्ण असणे आवश्यक आहे:

  • लाभार्थी मुलगी ही महाराष्ट्राची रहिवासी असावी
  • मुलीचे जन्मनोंद प्रमाणपत्र आवश्यक
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपये पेक्षा कमी असावे
  • मुलगी शाळेत शिक्षण घेत असावी
  • बालविवाह झालेल्या मुलींना लाभ मिळणार नाही
  • आयकर भरणारे पालक अपात्र असतील

Mahila Startup Yojana Maharashtra: महिलांना व्यवसाय करण्यासाठी मिळणार 5 लाख पर्यंत व्याजमुक्त कर्ज

आवश्यक कागदपत्रे

  1. मुलीचे जन्म प्रमाणपत्र
  2. पालकांचा आधार कार्ड
  3. उत्पन्न प्रमाणपत्र
  4. शाळेचा दाखला
  5. रहिवाशी प्रमाणपत्र
  6. बँक खाते आणि पासबुक (मुलीच्या किंवा पालकाच्या नावे)
  7. पासपोर्ट साइज फोटो

अर्ज प्रक्रिया

ऑफलाईन अर्ज:

  • जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय, नगर परिषद, किंवा महिला व बाल विकास कार्यालयात फॉर्म मिळतो
  • फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करावा
  • अधिकारी कडून अर्जाची पडताळणी केली जाते
  • पात्र असल्यास थेट बँक खात्यावर रक्कम जमा केली जाते.

निष्कर्ष

लेक लाडकी योजना ही मुलींसाठी महाराष्ट्र सरकारने दिलेली एक महत्वाची भेट आहे. ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही, तर ती सामाजिक परिवर्तन घडवणारी आहे. मुलगी ही आता ओझं नसून भविष्यातील उज्वल तेज आहे, हे पटवून देणारी ही योजना प्रत्येक गरजू कुटुंबाने जरूर वापरावी.

Leave a Comment