Ladki Bahin Yojana 13th Installment: महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिन योजनेची 13वा हप्ता अखेर जुलै 2025 मध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत निवडक पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते, जेणेकरून त्या स्वावलंबी बनतील आणि त्यांचा आर्थिक स्तर उंचावेल. आपण या लेखात 13व्या हप्त्याची तारीख, पैसे आले का हे कसे तपासायचे, आणि योजना अपडेट्स याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Free Gas Cylinder Yojana 2025: मोफत गॅस कनेक्शनसाठी अर्ज भरने सुरु, येथे करा अर्ज
Ladki Bahin Yojana 13th Installment | 13वी क़िस्त कधी आली?
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 13वी हप्त्याची रक्कम 15 जुलै 2025 पासून महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली असून, उर्वरित महिलांच्या खात्यातही लवकरच जमा होईल.
पात्र लाभार्थी कोण?
लाडकी बहिन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील अटी असाव्यात:
- महिला ही 21 ते 60 वर्षे वयोगटातील असावी
- महाराष्ट्रातील रहिवासी असावा
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे
- महिला शेतमजूर, बेरोजगार किंवा असंघटित क्षेत्रातील असावी
किती रक्कम मिळते?
लाडकी बहिन योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. ही रक्कम कोणत्याही मध्यस्थांशिवाय DBT पद्धतीने दिली जाते. परंतु ज्या महिलांना मागचा महिन्याचे पैसे अजून मिळाले नाही अशा महिलांना या महिन्यात 3000 रुपय ची रक्कम दिल्या जाणार आहे.
Bandhkam Kamgar Pension Yojana 2025: बांधकाम कामगारांसाठी दरमहा ₹3000 पेन्शन
पैसे आले का? असे तपासा
तुमच्या खात्यात 13वी हप्त्याची रक्कम जमा झाली आहे की नाही, हे खालील पद्धतीने तपासा:
- बँकेच्या मोबाइल अॅप मध्ये लॉगिन करा
- SMS अलर्ट तपासा
- जवळच्या CSC केंद्रावर जाऊन आधार सीडिंग व DBT स्टेटस तपासा
महत्त्वाची सूचना
जर तुमच्या खात्यावर अजूनही पैसे आले नसतील, तर घाबरू नका. काही जिल्ह्यांमध्ये तांत्रिक अडचणीमुळे पैसे थोड्या उशिराने जमा होत आहेत. तरी देखील 15 ते 20 जुलै 2025 दरम्यान सगळ्यांचे पैसे जमा होतील, असा सरकारचा दावा आहे.
निष्कर्ष
लाडकी बहिन योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत उपयुक्त अशी सामाजिक आर्थिक योजना आहे. Ladki Bahin Yojana 13th Installment, जुलै 2025 मध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असून, ही मदत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मोठा आधार ठरत आहे. जर तुम्ही पात्र असाल आणि तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर खात्री करून घ्या किंवा संबंधित कार्यालयात तक्रार नोंदवा. या योजनेचा लाभ घेत राहण्यासाठी अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
माझे नाव अंकिता आहे. मी या ब्लॉगची संपादक आणि मालक आहे. मला ब्लॉग लिहिण्याचा ३ वर्षांहून अधिक अनुभव आहे. माझ्या ३ वर्षांच्या अनुभवात मी नोकरीचे ब्लॉग, बातम्यांचे ब्लॉग आणि योजना लिहिल्या आहेत.
12th hafa not recieved me